Pune : धायरीत एटीएममध्ये महिलांची फसवणूक – एकाच पद्धतीने ९० हजार रुपये गायब!
Pune : नांदेड सिटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ८२/२०२५ अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम ३१८(४) आणि ३१९(२) अन्वये एका अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी, वय ४९ वर्षे, राहणार धायरी, पुणे यांनी तक्रार दाखल केली आहे.
हा प्रकार दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ७:०० ते १०:२१ वाजण्याच्या दरम्यान, साई पुरम सोसायटी, बेनकरवस्ती, धायरी, पुणे येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनजवळ घडला. (Pune News)
फिर्यादी या पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेल्या असता, त्यांनी एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकले. मात्र, कार्ड अडकल्याने त्यांनी एटीएमवरील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी अज्ञात मोबाईल धारकाने फिर्यादींना सांगितले की, “आज गुड फ्रायडेची सुट्टी आहे, मी येऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या एटीएम कार्डचा पिन टाकून ठेवा.” या खोट्या बहाण्याने आरोपीने फिर्यादींच्या बँक खात्यातून त्यांच्या संमतीशिवाय ५०,०००/- रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. याचप्रमाणे, आणखी एका महिलेचीही अशाच पद्धतीने ४०,०००/- रुपयांची फसDominantवणूक झाली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे (मोबाईल क्रमांक: ८६६९४६४९०३) करत आहेत.
पोलीसांचे आवाहन:
नागरिकांनी एटीएम किंवा बँकेशी संबंधित कोणत्याही हेल्पलाइनवर संपर्क साधताना सावधगिरी बाळगावी आणि अज्ञात व्यक्तींना आपली गोपनीय माहिती, जसे की पिन किंवा ओटीपी, शेअर करू नये, असे पोलीसांनी कळवले आहे.
नागरिकांनी एटीएम किंवा बँकेशी संबंधित कोणत्याही हेल्पलाइनवर संपर्क साधताना सावधगिरी बाळगावी आणि अज्ञात व्यक्तींना आपली गोपनीय माहिती, जसे की पिन किंवा ओटीपी, शेअर करू नये, असे पोलीसांनी कळवले आहे.