पिंपरी: व्यवसायासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा; मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक

0
c00666d2-60bc-4104-836a-f0771e4beb7d

पिंपरी: व्यवसायासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा; मानसिक छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक Pimpri: Pressure to bring money from abroad for business

पिंपरी: येथील अजमेरा परिसरात व्यवसायासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी सुरू असलेल्या मानसिक छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली असून, दोन महिलांचा शोध सुरू आहे.

ही घटना दि. २७/०८/२०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजता चैताली हौसिंग सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये घडली. फिर्यादी वंदना जोरी यांची मुलगी माधवी महेश पाटील हिने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या पतीसह तीन आरोपींनी मे २०२४ पासून तिच्याकडे व्यवसायासाठी माहेरून पैसे आणण्याचा वारंवार तगादा लावला होता.

आरोपी पती महेश पांडुरंग पाटील (वय ३६) आणि इतर दोन महिला आरोपींनी माधवीचा मानसिक छळ केला. या सततच्या त्रासाला वैतागून अखेर तिने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.

या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पती महेश पाटील याला अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक पांडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed