Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

चंद्रपूर: प्रेमविवाह केला, जुळ्या मुली झाल्या, तरीही नवऱ्याने दुसऱ्या महिलेसोबत लग्न करून पळ काढला; पीडित पत्नीची पोलिसांत धाव

0

Pune : शहरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. प्रेमविवाह करून दोन जुळ्या मुलींची आई झालेल्या एका महिलेवर काळाने घाला घातला आहे. तिचा पती अचानक दुसऱ्या महिलेसोबत लग्न करून पळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित पत्नीने आपल्या नवऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करत रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, या घटनेने पती-पत्नीच्या नात्यातील विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सौ. मीनाक्षी विज्ञान पोद्दार (वय ३५), रा. बंगाली आष्टी, जि. गडचिरोली, सध्या चंद्रपूर येथील इंदिरानगर, वाल्मीकी ऋषी चौक येथील वडील अरुण गोविंदा लांडगे यांच्याकडे वास्तव्यास आहे. मीनाक्षीने रामनगर पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिचा चंद्रपूर येथील इंदिरानगर येथे राहणारा विशाल विश्वजीत पोद्दार याच्यासोबत प्रेमसंबंधातून दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी पोचानी गडपूर कोर्टमध्ये नोंदणी विवाह झाला होता. त्यानंतर दोघे पती-पत्नी म्हणून एकत्र राहत होते. त्यांच्या सुखी संसारात कु. बिस्टी आणि कु. क्रादी (अंदाजे दीड वर्षांच्या) नावाच्या दोन जुळ्या मुलींचा जन्म झाला. विशाल हा मोबाईल दुरुस्ती व सॉफ्टवेअरचे काम करत होता.

हे सर्व सुरळीत सुरू असताना, दि. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी विशाल पोद्दार याने कामासाठी अकोल्याला जात असल्याचे सांगून घर सोडले. त्यानंतर त्याने आपला मोबाईल बंद केला. अनेक दिवस विशालचा संपर्क होत नसल्याने मीनाक्षीने शोध घेतला असता तिला धक्कादायक माहिती मिळाली. विशालने एका दुसऱ्या मुलीसोबत लग्न करून तिच्यासोबत पळ काढल्याचे त्या मुलीचे वडील इंद्रजीत मंडल यांनी मीनाक्षीला सांगितले. नवऱ्याच्या या कृत्यामुळे मीनाक्षीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या १० महिन्यांपासून ती आपल्या दोन्ही लहान मुलींना घेऊन वडिलांकडे राहत आहे आणि घरकाम करत आहे.

आपल्या पतीच्या या फसवणुकीच्या कृत्याविरोधात कायदेशीर कारवाई व्हावी, या मागणीसाठी मीनाक्षी पोद्दार हिने दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी रामनगर पोलीस ठाण्यात समक्ष हजर राहून तोंडी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला असून, पुढील तपास सुरू केला आहे. प्रेमविवाहानंतरही पतीच्या अशा विश्वासघातकी वागण्यामुळे मीनाक्षीला मोठा मानसिक धक्का बसला असून, तिला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. या घटनेमुळे समाजात अशा फसवणुकीच्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली जात आहे.

Follow Us
Leave A Reply

Your email address will not be published.