Pune पुण्यात खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी ४ महिन्यांनंतर अटक
पुणे (Pune) शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत खुनाच्या प्रयत्नातील आरोपी सिध्दार्थ दत्तात्रय मोरे याला तब्बल ४ महिन्यांच्या फरार अवस्थेनंतर अटक करण्यात आली आहे.
गुन्हा रजिस्टर नंबर ७६/२०२४ नुसार, १४ एप्रिल २०२४ रोजी आरोपीने त्याच्या मित्रावर धारदार हत्याराने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केला होता. नवी पेठ येथे जयंती पाहण्यासाठी आलेल्या फिर्यादीस दुचाकी चालविण्यास सांगून, घोलप मटन शॉप समोर पोहोचल्यावर मागील भांडणाचा राग मनात ठेवून, आरोपीने धारदार शस्त्राने फिर्यादीच्या मानेवर वार केला. या घटनेनंतर, आरोपीने फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
Pune सिंहगड रोड हॉटेलमध्ये तुफान हाणामारी,तिघांनी केला युवकाचा खून केला !
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती विजयमाला पवार यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास पथकास आदेश दिले होते. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त खब-यांच्या मदतीने, आरोपी सिध्दार्थ मोरे हा त्याच्या पत्नीस भेटण्यासाठी नन्हे येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलीसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त संदिपसिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस उप निरीक्षक मनोज बरुरे, अंमलदार सचिन अहिवळे, मयुर भोसले, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, साताप्पा पाटील, संतोष शेरखाने आणि सागर मोरे यांचा समावेश होता.