कर्जत (अहमदनगर) – कर्जत नगर पंचायत निवडणुकीच्या व्हिडिओचित्रीकरणाचे टेंडर घेतलेल्या आशिष बोरा यांनी २०१५ आणि २०२१-२२ अशा दोन वेळच्या कामांचे पैसे न मिळाल्याने अनेकदा पत्र व्यवहार केला आणि उपोषणही केले आहे. परंतु, त्यातून त्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. यामुळे दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने बोरा यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. प्रशासन जर त्यांना जीव देण्यास भाग पाडण्याची परिस्थिती निर्माण करत असेल, तर लगेच तेथेच त्यांची श्रद्धांजली सभा आयोजित करण्याचा निर्णय त्यांच्या मित्र परिवाराने घेतला आहे. जिवंत पणीच आपल्या श्रद्धांजली सभेचे आवाहन पाहण्याची वेळ बोरा यांच्यावर आलेली आहे.
आज सर्वसामान्य नागरिक आपल्याच कामात व्यस्त असल्याने प्रशासनावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे अनेक कायदे असूनही प्रशासकीय अधिकारी मनमानी करत आहेत. बोरा यांना याचाच कटू अनुभव सध्या घेत आहेत. अनेक लोक सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहू लागले आहेत, पण वरिष्ठांच्या कार्यपद्धतीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणाऱ्या बोरा यांना खरंच जीव देण्याची वेळ येईल का? हा प्रश्न सध्या सर्वत्र उपस्थित केला जात आहे.
बँकेत नोकरीची संधी! 80,000 पेक्षा जास्त पगार, 450 हून अधिक जागा!
बोरा यांच्या या संघर्षाला प्रशासनाने त्वरित लक्ष दिले पाहिजे आणि त्यांच्या कामाचे पैसे त्वरीत द्यावे अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. जर प्रशासनाने या गोष्टीची दखल घेतली नाही, तर बोरा यांचा संघर्ष आणखी गंभीर होऊ शकतो आणि प्रशासनाच्या मनमानीमुळे एका निष्पाप नागरिकाचा जीव जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
आशिष बोरा यांच्या या न्यायासाठीच्या लढ्यात सर्वांनी एकत्र येऊन त्यांना साथ देण्याची गरज आहे, जेणेकरून प्रशासनावर दबाव निर्माण होऊन त्यांना न्याय मिळू शकेल.