पानशेत धरणात मुसळधार पर्यन्यवृष्टीमुळे ९४ टक्के क्षमतेने भरला जलाशय , विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता !

पानशेत धरणात मुसळधार पर्यन्यवृष्टीमुळे ९४ टक्के क्षमतेने जलाशय भरला

Due to heavy rain in Panshet Dam, the reservoir is filled to 94 percent capacity, there is a high possibility of starting discharge: पानशेत, २८ जुलै २०२४ – पानशेत धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून धरण जलाशय आज सकाळी ५.०० वाजता ९४ टक्के क्षमतेने भरले आहे. या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे, ज्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

धरण क्षेत्रातील पावसाचे प्रमाण वाढल्याने, संबंधित अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करीत आहेत. पानशेत धरणाच्या जलाशयातील पाणी पातळी सतत वाढत आहे आणि जर पाऊस असाच सुरु राहिला तर सांडव्यावरून पाणी सोडण्याची कार्यवाही कधीही होऊ शकते.

स्थानिक नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे अशी विनंती करण्यात येत आहे. संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे.

धरण क्षेत्रात सतत पावसामुळे पानशेत धरणाच्या पाण्याचा विसर्ग सुरू केल्यास, आसपासच्या गावांमध्ये याची माहिती वेळीच पोहोचवली जाईल.

पुढील अपडेटसाठी आणि सावधानतेसाठी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.

Leave a Comment