Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

Flipkart Delivery Boy News : ई-कॉमर्स डिलिव्हरी बॉयचे नीच कृत्य, फूड ब्लॉगरसोबत गैरवर्तन!

0

बेंगळुरू: ऑनलाइन शॉपिंगच्या युगात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बेंगळुरूतील प्रसिद्ध फूड ब्लॉगर नीलोफर फातिमा हिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली आहे.Flipkart Delivery Boy News

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नीलोफरने Flipkart किंवा Myntra वरून एक पार्सल मागवले होते. डिलिव्हरी देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयने सुरुवातीला तिची दिशाभूल करून बळजबरीने तिच्या घरातील वॉशरूमचा वापर केला. मात्र, बाहेर आल्यानंतर त्याने जे कृत्य केले, ते अत्यंत संतापजनक होते. त्या नराधमाने नीलोफरसमोर त्याचे प्रायव्हेट पार्ट (Private Part) प्रदर्शित करून नीचपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या.Myntra Delivery Scam

नीलोफरची धडाकेबाज भूमिका

अशा कठीण प्रसंगात नीलोफरने डगमगून न जाता धैर्याने त्या घटनेचा व्हिडिओ बनवून आपल्या Instagram हँडलवर शेअर केला. या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्या आरोपी डिलिव्हरी बॉयला अटक (Arrest) केली आहे.

टीकाकारांना खणखणीत उत्तर

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, सोशल मीडियावर काही विकृत मानसिकतेचे लोक या गंभीर प्रकरणाला ‘व्ह्यूज मिळवण्यासाठी केलेला स्टंट’ असल्याचे म्हणत आहेत. मात्र, सोशल मीडिया युजर्सनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. ज्या ब्लॉगरच्या व्हिडिओला आधीच ३ ते ५ मिलियन (3-5M) व्ह्यूज मिळतात, तिला अशा स्वस्त प्रसिद्धीची काय गरज? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अपराधी व्यक्तीचे समर्थन करणारे हे लोक खरंच समाजासाठी धोकादायक आहेत.

  • Niloufer Fatima Viral News

Follow Us
Leave A Reply

Your email address will not be published.