---Advertisement---

Pune : मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास,या १२ ओळखपत्रांचा वापर करता येणार !

On: October 24, 2024 10:19 AM
---Advertisement---

Image पुणे, दि. २२ ऑक्टोबर २०२४ – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र नसल्यास मतदारांना दिलासा दिला आहे. मतदार ओळखपत्र नसेल तरी मतदान करता येईल, फक्त मतदाराने खालीलपैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर करावे लागेल. यामध्ये १२ विविध ओळखपत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

मतदानासाठी मान्य असलेले ओळखपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र
  4. कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
  5. वाहन चालक परवाना
  6. पासपोर्ट
  7. निवृत्तिवेतन दस्तऐवज
  8. मनरेगा रोजगार ओळखपत्र
  9. शासकीय/सार्वजनिक उपक्रम/पब्लिक लिमिटेड कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे सेवा ओळखपत्र
  10. बँक किंवा टपाल विभागाचे पासबुक (छायाचित्रासह)
  11. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही स्मार्ट कार्ड
  12. संसद/विधानसभा/विधानपरिषद सदस्यांचे ओळखपत्र

या सर्व ओळखपत्रांपैकी कोणतेही एक दस्तऐवज मतदानाच्या वेळी मतदारासोबत बाळगणे अनिवार्य आहे. भारत निवडणूक आयोग याबाबत जनतेमध्ये जनजागृती करत असून, मतदारांनी मतदान केंद्रावर योग्य ओळखपत्रासह हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास मतदारांनी Voter Helpline App वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment