सातारा : धोकादायक सेल्फीच्या प्रलोभनाला(Pune girl rescued) बळी पडून एक तरुणी ६० फूट खोल दरडीत पडली.(Pune girl rescued ) ही धक्कादायक घटना शनिवारी सातारा जिल्ह्यातील बोराणे घाटावर घडली. या तरुणीची नाव नसरीन आमिर कुरेशी (वय २९, रा. वाडज, पुणे) असे आहे. तिला स्थानिकांच्या आणि होमगार्डच्या मदतीने वाचवण्यात यश आले.
दरम्यान, जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे थोसेघरसह अनेक धबधबे फुलले आहेत. या पार्श्वभूमीवर शनिवारी पुणेहून एक गट थोसेघरला पिकनिकला आला होता. यावेळी बोराणे घाटावर सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात नसरीन चुकून ६० फूट खोल दरडीत पडली.
घटनास्थळी गर्दी जमली. स्थानिकांनी तात्काळ मदत केली. तसेच, होमगार्डलाही याबाबत कळवण्यात आले. त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून नसरीनला वाचवण्यात यश आले. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे धोकादायक सेल्फीचे दुष्परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. पावसाळ्यात विशेषतः अशा पर्यटनस्थळांवर सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.