Pune : शेजारचे बाहेर गेले होते याची नजर त्यांच्या कुत्रीवर पडली ; हडपसरमध्ये श्वानावर अत्याचार

पुणे, दि. १२ एप्रिल २०२५: पुण्यात सध्या दर दुसऱ्या दिवशी एक भयंकर घटना समोर येत आहे. यावेळी हडपसर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका विकृत इसमाने श्वानावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सीसीटीव्हीमुळे घटना उघड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कुत्र्याचा मालक परगावी गेला असताना घडली. परत आल्यानंतर त्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर त्याने तातडीने पोलिस
ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपी मूळचा पश्चिम बंगालचा
आरोपीचे नाव हलीमुद्दीन शेख (वय २० वर्षे, सध्या राहणार: सुंदर सोसायटी, हांडेवाडी, हडपसर, पुणे; मूळ गाव: कांदोरी, थाना खडगाव, जिल्हा मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल) आहे. तो सध्या हडपसरमधील हांडेवाडी परिसरात राहतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
नागरिकांमध्ये संताप
या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशा अमानुष कृत्यांमुळे समाजात प्राण्यांबद्दल असंवेदनशीलता वाढत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
प्राण्यांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदे आणि सामाजिक जागरूकता वाढवण्याची गरज असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Leave a Comment