लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता कधी मिळणार ? जाणून घ्या

mainLogo

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार? 29 सप्टेंबरला मिळणार निधी!

मिळालेल्या माहितीनुसार, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. संभाव्य निर्णयानुसार, येत्या 29 सप्टेंबर रोजी तिसरा हप्ता वाटप केला जाऊ शकतो. रायगड येथे या हप्त्याच्या वाटपासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला जाण्याची शक्यता असून, या संदर्भातही बैठकीत चर्चा होईल.

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आधीची मुदत 31 ऑगस्ट होती, मात्र जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेसाठी इच्छुक महिला 8329865383 या नंबरवर संपर्क करून घरबसल्या अर्ज करू शकतात.

Leave a Comment