Loading Now

Hadapsar : किरकोळ वादाचा भयंकर परिणाम: हडपसर पोलिसांकडून ६ आरोपींना अटक

Hadapsar : किरकोळ वादाचा भयंकर परिणाम: हडपसर पोलिसांकडून ६ आरोपींना अटक

Loni-kalbhor-3-300x167 Hadapsar : किरकोळ वादाचा भयंकर परिणाम: हडपसर पोलिसांकडून ६ आरोपींना अटक

Hadapsar  : हडपसर पोलिसांकडून किरकोळ वादावरून झालेल्या खुनाचे गुन्ह्यात ६ आरोपींना अटक

पुणे, दि. २१ डिसेंबर २०२३: पुणे शहरातील हडपसर (Hadapsar  News )पोलिसांनी किरकोळ वादावरून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यात सहा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी मयत अभिषेक संजय भोसले याला लोखंडी धारदार शस्त्राने व दगडाने मारहाण करून त्याला जीवे ठार मारले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी रात्रौ ९:५५ वाजताचे सुमारास चंदवाडी, फुरसुंगी येथे आरोपी विलास सकट व मयत अभिषेक संजय भोसले यांच्यात दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६:०० वाजताचे सुमारास झालेल्या किरकोळ वादाचे कारणावरून आरोपी कैलास सकट व सचिन सकट व अनोळखी ७ ते ८ इसमांनी मिळून फिर्यादी यास लाथा बुक्या व दगडाने मारहाण केली तसेच मयत यास लोखंडी धारदार शस्त्राने व दगडाने मारहाण करुन त्यांना जीवे ठार मारले. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांना आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उप-निरीक्षक अविनाश शिंदे आणि अंमलदार हे बारामती येथे रवाना झाले व दुसरे पथक वाघोली, पुणे येथे रवाना झाले. तपासादरम्यान आरोपी नामे १) विलास सुरेश सकट वय ३८ वर्षे, २) कैलास सुरेश सकट वय २० वर्ष ३) प्रमोद ज्ञानेश्वर राखपसरे वय १९ वर्षे, ४) प्रशांत ज्ञानेश्वर राखपसरे वय २१ वर्षे ५) सचिन संजय सकट वय २९ वर्ष ६) ज्ञानेश्वर प्रभु राखपसरे सर्व राहणारचंदवाडी, फुरसुंगी, पुणे यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.

Pune : सदाशिव पेठेत पाव भाजी सेंटर मालकावर धारदार हल्ला, दोघे अटकेत

आरोपींकडे केले तपासात आरोपी विलास सकट याने मयत अभिषेक संजय भोसले यांचेत दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६:०० वाजताचे सुमारास झालेल्या किरकोळ वादाचे कारणावरून खुन केल्याचे सांगितले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पो. निरीक्षक नानासाहेब जाधव हे करीत आहेत.

Vadgaon Pune : वडगाव पठारात २५ वर्षीय तरुणाचा खून !

या कामगिरीवर मा. अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ श्री. आर राजा, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्रीमती अश्विनी राख, यांचेकडून पोलिसांना प्रशंसा करण्यात आली आहे.

ad

Post Comment