letest News & updets in Pune

Kantara Chapter 1: कंतारा ए लेजेंड चॅप्टर-1 फर्स्ट लूक टीझर रिलीज, रिषभ शेट्टींच्या अभिनयाची चमक

Kantara Chapter 1 :कन्नड सिनेमातील लोकप्रिय अभिनेता रिषभ शेट्टी यांच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर रिलीज झाला आहे. ‘कंतारा: ए लेजेंड चॅप्टर-1’ या नावाने हा चित्रपट बनला असून त्यात रिषभ शेट्टी मुख्य भूमिकेत आहेत.

या टीझरमध्ये रिषभ शेट्टींच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळते. त्यांच्या अंगावर पारंपरिक वेषभूषा असून ते एका जंगलात भटकत आहेत. टीझरमध्ये अनेक रोमांचक आणि रहस्यमय दृश्ये दाखवले आहेत, ज्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Redmi 13C: नवीन स्टार्शाइन डिझाईनसह खतरनाक स्मार्टफोन , यादिवशी होणार लॉन्च !

या चित्रपटाची कथा एका काल्पनिक गावाभोवती फिरते ज्यामध्ये लोकप्रिय देवतांच्या आशीर्वादाची पूजा केली जाते. मात्र, या गावात घडणाऱ्या अनेक विचित घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरते. अशा परिस्थितीत रिषभ शेट्टींवर गावाचे रक्षण करण्याची जबाबदारी येते.

‘कंतारा: ए लेजेंड चॅप्टर-1’ हा चित्रपट अजयनेश यांनी संगीतबद्ध केला असून त्याचे दिग्दर्शन रिषभ शेट्टींचेच आहे. विजय किरागंदूर यांनी हा चित्रपट प्रोड्यूस केला असून तो होम्बले फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित आहे.

या चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आली नाही, मात्र लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Join Buttons Join WhatsApp Group Join Telegram Channel
Leave A Reply

Your email address will not be published.