“ज्येष्ठ नागरिकांसाठी सुवर्णसंधी: मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत मोफत तीर्थयात्रा “

Chief Minister’s Pilgrimage Scheme : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व धर्मीय 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शनाची सुविधा दिली जात आहे. योजनेमध्ये भारतातील 73 आणि महाराष्ट्रातील 66 प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

योजनेचे लाभ:

योजनेअंतर्गत जिल्हानिहाय कोट्याच्या आधारे लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या पात्र ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेसाठी मोफत प्रवास, भोजन, आणि निवासाची सोय दिली जाईल. यात्रेसाठी प्रवास खर्चाची कमाल मर्यादा 30,000 रुपये प्रती व्यक्ती ठेवण्यात आली आहे, ज्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे. लाभार्थी एकवेळ या योजनेतून तीर्थयात्रेचा लाभ घेऊ शकतील.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लीक करा 

पात्रतेचे निकष:

  1. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याचे वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
  2. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असावे, तसेच कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा.
  3. कुटुंबातील सदस्य शासकीय, उपक्रम, मंडळ, स्थानिक संस्था किंवा निवृत्तीवेतन घेणारा नसावा.
  4. लाभार्थी शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रवासासाठी सक्षम असावा आणि कोणत्याही संसर्गजन्य किंवा गंभीर आजाराने ग्रस्त नसावा.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लीक करा 

आवश्यक कागदपत्रे:

  • ऑफलाइन अर्ज
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र / जन्मदाखला
  • उत्पन्नाचा दाखला / पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

ही योजना ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रेसाठी उत्तम संधी देणारी असून, त्यांना त्यांच्या धर्माच्या स्थळांचे दर्शन मोफत करता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी क्लीक करा 

 

Leave a Comment