पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी द्यावा – रोहित पवार
काल अर्थसंकल्पीय भाषणामध्ये महापुरुषांच्या जन्मस्थळाबद्दल बोलताना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ चौंडीचा उल्लेख मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राहिला होता, तो उल्लेख महापुरुषांच्या जन्मभूमीच्या विकासाच्या बाबतीत उत्तर देताना करून माझ्या मतदारसंघात असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळासाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, अशी विनंती आज त्यांना भेटून केली. काल अर्थमंत्र्यांनी भाषणात केलेल्या संतांच्या उल्लेखाला अनुसरून माझ्या मतदारसंघात श्री संत सद्गुरू गोदड महाराज, संत गिते बाबा, संत सिताराम बाबा यांचे समाधीस्थळ आहेत. त्यासाठी सुद्धा मविआ सरकारच्या काळात मोठा निधी देण्यात आला असून त्यावरील स्थगितीही उठवावी, अशी मागणी केली. सिद्धटेक येथील अष्टविनायकांपैकी एक गणपती, राशीन येथील जगदंबा मंदिर या देवस्थानांचे व खर्डा किल्ला याचे जे प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयापर्यंत आणून ठेवले होते, त्याबाबतीत सरकार बदलल्यानंतर कोणतीही कार्यवाही झालेली नाही तर त्याला मान्यता द्यावी, अशी देखील विनंती यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांना केली.
TOP 20 Unique Username for Instagram For Boy