गुन्हे शाखा युनिट ५ ने तडीपार गुंडाला पिस्तुलसह अटक केली
Pune News: दिनांक २९ मार्च २०२४ रोजी, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट ५ द्वारे गुन्हेगारांकडून कोणतेही अनैतिक प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या पथकांनी परिसरात गस्त घातली होती.
यातील एका पथकातील पोलीस कर्मचारी प्रताप गायकवाड आणि अकबर शेख यांना माहिती मिळाली की, मागील ५ महिन्यांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केलेला गुन्हेगार अभिषेक अनिल भडंगे हा शेवाळवाडी बस डेपो परिसरात पिस्तुल घेऊन फिरत आहे आणि कदाचित गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने आहे.
त्यानुसार, तडीपार आरोपी अभिषेक अनिल भडंगे, वय २२ वर्षे, रा. खुर्शीद अपार्टमेंट, दुसरा मजला, बंटर हायस्कूलजवळ, गाडीतळ, हडपसर, पुणे याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले, जे तो दहशत निर्माण करण्यासाठी वापरत होता.
त्याला पिस्तुलसह ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्रास्त्र कायद्याचा कलम ३(२५) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम ३७(१)(३) सह १३५ आणि १४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
आरोपी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून त्याला पुणे शहर आणि जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले होते.