पुण्यात गुंडाची परेड काढणारे अमितेश कुमार आहेत तरी कोण? जाणून घ्या
पुणे, दि.7 फेब्रुवारी, 2024 : पुणे शहरातील नविनयुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे भारतीय सेवा पोलीस सेवेतील 1995 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. अमितेश कुमार यांनी 2006 च्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामान्यवरील सट्टबाजीचा प्रकार उघडकीस आणला होता. तर आता पुणे शहरात पहिल्यांदाच अमितेश कुमार यांची नियुक्ती झाली आहे.
दिवसेंदिवस पुणे शहरातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कुख्यात गुंडाणा पोलीस आयुक्त कार्यालयात हजर करण्यात आले. शहरातील कायदा व सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्ताकडून जवळपास 300 ते 350 गुन्हेगारांची परेड काढली. यामध्ये बाबा बोडके, गजा मारणे व निलेश घायावळ यांसारख्या गुन्हेगारांचा समावेश होता.
शरद मोहोळच्या हत्तेनंतर पुण्यातील सुव्यस्थेबाबत प्रशचिन्ह निर्माण झाले होते. परंतु आता या घटनाची जाणीव ठेवत नवीन पोलीस आयुक्त ऍक्शन मोडमध्ये आहेत.
हे वाचा :
अशा प्रकारे परेड काढण्यात आली
पुण्यातील सर्व गुन्हेगारांची ओळख परेड घेतली. अमितेश कुमार हे स्वतः प्रत्येक गुन्हेगारांकडे गेले व सोशल मीडियावर रिल्स न बनवण्याचं आश्वासन घेतलं तसेच आता ‘कोणताही गुन्हा होणार नाही’ याची कबुली गुन्हेगारांकडून घेतली.
नवीन पोलिसायुक्त अमितेश कुमार यांच्या या ऍक्शन मुळे पुणे शहरातील गुन्हेगारांना मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे.