
येरवडा शास्त्री नगर चौकातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी 97 कोटींचा प्रकल्प मंजूर

पुणे: येरवडा शास्त्री नगर चौकातील दीर्घकाळापासून सुरु असलेल्या वाहतुक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. यासाठी उड्डाण पूल आणि भुयारी मार्गाच्या 97 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्प आराखड्यास पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रक समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
या प्रकल्पामुळे शास्त्री नगर चौकातील वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल आणि नागरिकांना सुकर प्रवासाचा लाभ मिळेल. या निर्णयाची माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी दिली आहे.
आमदार सुनील टिंगरे यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच, या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे परिसरातील नागरीकांना दिलासा मिळेल आणि परिसराचा विकासही होईल.
पुढील काही दिवसांत या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस सुरुवात होणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे नागरिकांमध्ये या प्रकल्पाबद्दल मोठी उत्सुकता आहे.