पुणे : महाराष्ट्रात दहीहंडी उत्सव (dahi handi 2024) नेहमीच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, आणि यंदाही काही वेगळं नाही. प्रत्येक वर्षी विविध पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते मोठ्या धूमधडाक्यात दहीहंडीचे आयोजन करतात, त्याचबरोबर शक्तिप्रदर्शनही करतात. यावर्षी पुण्यात शिंदे गटाने (Eknath Shinde) मोठ्या धामधुमीत दहीहंडी उत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे.
शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली हांडेवाडी येथे धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात सात लाखांच्या रोख बक्षिसांसह विविध परितोषिके देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला शिंदे गटाचे प्रमुख नेते, मंत्री तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, आमदार शहाजी पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या उत्सवात राज्यभरातून मोठ्या संख्येने महिला दहीहंडी पथक सहभागी होणार असल्याची माहिती प्रमोद भानगिरे यांनी दिली आहे. या दहीहंडीच्या माध्यमातून शिंदे गट पुण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे, अशी चर्चा आहे