
आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आणि अनेकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेले श्री श्री रविशंकर यांची शनिवारी पुणे विमानतळावर अनौपचारिक भेट घेण्यात आली. या भेटीच्या वेळी भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.
श्री श्री रविशंकर यांच्या सोबत झालेली ही भेट अनेकांसाठी एक प्रेरणादायी क्षण ठरला. पुणे शहराच्या विकासाबाबत आणि समाजकार्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल घाटे यांनी त्यांचे आभार मानले.