Pune : महिला गुंतवणूकदाराला ट्रेडिंग अॅपद्वारे 26 लाखांची फसवणूक!
Pune City Live News :पुण्यातील वडगाव शेरी परिसरात (Pune News Today )राहणाऱ्या 44 वर्षीय महिलेला ट्रेडिंग अॅप (Trading app) द्वारे 26 लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघड झाली आहे. (Pune News today Marathi )याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांना ट्रेडिंगमध्ये (Trading ) रक्कम गुंतवणूक (investment ) केल्यावर जास्त परतावा मिळेल असे आमिष दाखवण्यात आले. यानंतर, त्यांना व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यास सांगण्यात आले आणि त्यातून अकाऊंट ओपन करण्यासाठी लिंक पाठवण्यात आला. फिर्यादी यांनी लिंकवर क्लिक करून आपली माहिती भरली आणि ट्रेडिंग अॅप डाउनलोड केले.
यानंतर, आरोपींनी फिर्यादी यांना विविध शेअर्स खरेदी करण्यास आणि IPO साठी विविध अकाऊंटवर रक्कम भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी आपल्या आईच्या नावावर असलेल्या ए.यू. स्मॉल फायनान्स बँकेच्या खात्यातून 88,370 रुपये अशी किरकोळ रक्कम परत केली. मात्र, आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून एकूण 26,01,630 रुपये फसवणूक केली.
फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यावर फिर्यादी यांनी तात्काळ चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी ट्रेडिंग अॅप आणि आरोपींच्या मोबाइल नंबरच्या आधारावर तपास सुरू केला असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.