पुणे: अतिक्रमण हटविण्याच्या आदेशामुळे फ्लॅटधारकांमध्ये भीती आणि असुरक्षेचे वातावरण

बंडगार्डन रोड, पुणे येथे अतिक्रमण हटविण्याबाबतची अधिसूचना; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पुणे, बंडगार्डन रोड: महाराष्ट्र शासनाच्या कस्टोडियन ऑफ इव्याक्यु प्रॉपर्टीजच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याच्या कारणावरून तहसिलदार पुणे शहर तथा व्यवस्थापकीय अधिकारी यांनी नोटीस जारी केली आहे. या नोटीसमुळे परिसरातील फ्लॅटधारक आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या हंगामात अनपेक्षितपणे कारवाई होण्याची शक्यता असल्यानं नागरिक चिंतेत आहेत. त्यांनी प्रशासनाला आपल्या समस्यांचा विचार करून निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

१) मा. उच्च न्यायालय मुंबई आदेश दिनांक ३०/११/२०२३.
२) तहसिलदार कार्यालयाकडून जारी केलेली नोटीस दिनांक १५/०१/२०२४.
३) मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली आदेश दिनांक २२/०४/२०२४.

तहसिलदार पुणे शहर कार्यालयाने दिलेल्या नोटीसनुसार, बंडगार्डन रोड, पुणे येथे अनधिकृत ताबा काढण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. सात दिवसानंतर कोणतीही पूर्व सूचना न देता अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.

नागरिकांचे म्हणणे: या नोटीसमुळे परिसरातील फ्लॅटधारक आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाळ्याच्या हंगामात कारवाई होणे अशक्य आहे, असे म्हणत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांचा दावा आहे की, सदर जागा खासगी आहे आणि त्यावर अतिक्रमण दाखवले जात आहे.

फ्लॅटधारकांनी प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे आणि त्यांनी याबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने अतिक्रमण हटवण्यापूर्वी नागरिकांच्या समस्यांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

तहसिलदार पुणे शहर यांच्या नोटीसेचे संपूर्ण विवरण:

वाचा संबंधित बातम्या:

Pune: An atmosphere of fear and insecurity among flat owners due to the order to remove encroachments

 

 

Leave a Comment