Pune : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वाहतुकीत बदल !

0
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वाहतुकीत बदल

पुणे, दिनांक: २८ जुलै २०२५: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी पुणे शहरातील विविध स्थानिक मंडळे आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा, सारसबाग, पुणे’ या ठिकाणी मिरवणुकीने येऊन पुष्पहार अर्पण करणार आहेत. तसेच, जेधे चौक ते सारसबाग दरम्यानच्या बालाजी विश्वनाथ पथावर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमणार आहेत. यामुळे वाहनचालकांची गैरसोय होऊ नये आणि वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहावी यासाठी, महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या सूचनेनुसार, पोलीस उप-आयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर, हिंमत जाधव यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६(१)(२)(बी), ११६(४) आणि ११७ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून स्वारगेट परिसरातील वाहतुकीत दिनांक ०१/०८/२०२५ रोजी सकाळी ०७:०० वाजेपासून आवश्यकतेनुसार खालीलप्रमाणे बदल केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना (उदा. फायरब्रिगेड, रुग्णवाहिका, पोलीस वाहने) या नियमांमधून वगळण्यात आले आहे.


 

वाहतुकीतील बदल आणि पर्यायी मार्ग:

 

बंद करण्यात आलेले रस्ते:

  1. जेधे चौकातून सारसबागकडे जाणारी वाहतूक: पूर्णपणे बंद.
  2. जेधे चौकातील वाय जंक्शन (फ्लायओव्हर) वरून सारसबागेकडे जाणारी वाहतूक: मनाई.
  3. वेंगा सेंटर ते सारसबाग पर्यंत ग्रेडसेपरेटरमधून वाहनांना प्रवेश: बंद.
  4. सावरकर चौकापासून पुढे पुरम चौकापर्यंत जाणारी वाहतूक: बंद.
  5. दांडेकर पूल / सिंहगड जंक्शन येथून सावरकर चौकाकडे जाणारी वाहतूक: बंद.

पर्यायी मार्ग:

  1. सिंहगड रोडला जाण्यासाठी:
    • जेधे चौकाकडून सातारा रोडने सरळ व्होल्गा चौक, मित्रमंडळ चौक, सावरकर चौक मार्गे सिंहगड रोडला जावे.
  2. सिंहगड रोडकडून स्वारगेटकडे जाण्यासाठी:
    • दांडेकर पूल, नाथ पै चौक, ना. सी. फडके चौक, पुरम चौक, टिळक रोडने जेधे चौक या मार्गाचा वापर करावा.
  3. कात्रजकडून सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी:
    • ब्रीजवरून न जाता लक्ष्मीनारायण (व्होल्गा चौक) चौकातून डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे.
  4. वेगा सेंटरकडून येणाऱ्या वाहनांसाठी:
    • घोरपडी पेठ उद्यान, राष्ट्रभूषण चौक येथून हिराबाग चौकाकडून इच्छित स्थळी जावे.
  5. नाथ पै चौकाकडून येणाऱ्या वाहनांसाठी:
    • सावरकर चौक, दांडेकर पूल, ना. सी. फडके चौक, कल्पना हॉटेलकडून डावीकडे टिळक रोड मार्गे इच्छित स्थळी जावे.
  6. सावरकर चौकाकडून येणाऱ्या वाहनांसाठी:
    • दांडेकर पूल, ना. सी. फडके चौक, कल्पना हॉटेलकडून डावीकडे टिळक रोड, पुरम चौक मार्गे इच्छित स्थळी जावे.
  7. पुरम चौक ते जेधे चौक रस्ता:
    • या रस्त्यावरील एकेरी वाहतूक शिथिल करून दुहेरी वाहतूक करण्यात येईल.
  8. दांडेकर पूल व सावरकर चौक येथील वाहतूक:
    • आवश्यकतेनुसार दुपारी ३:०० ते रात्री १२:०० वाजेपर्यंत शिथिलता देऊन दुहेरी प्रवेश देण्यात येईल.
  9. निलायम ब्रिजने सावरकर चौकाकडे येणारी वाहतूक:
    • आवश्यकतेनुसार निलायम ब्रिजवरून पर्वती गाव मार्गे वळविण्यात येईल.
  10. शिवाजी रोडवरील वाहतूक:
    • आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल.
  11. सेव्हन लव्हज चौकातून जेधे चौकाकडे जाणारी वाहतूक:
    • आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल.
  12. सातारा रोडकडून मित्रमंडळ चौक मार्गे सावरकर चौकाकडे येणारे अनुयायी:
    • आपली दुचाकी वाहने पाटील प्लाझा येथे पार्क करावीत.

महत्त्वाची सूचना: सदर भागातील वाहतुकीच्या परिस्थितीनुसार तात्पुरत्या स्वरूपात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत. तरी वाहनचालकांनी उपलब्ध पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *