पुणे, ०१ जुलै २०२५: वानवडी पोलीस स्टेशन (Wanwadi Police Station) हद्दीत PMPML बसमध्ये (PMPML Bus) प्रवास करत असताना एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेची सोन्याची बांगडी (Gold Bangle) चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. शंकरशेठ रोडवरील (Shankarsheth Road) धोबीघाट जवळील डॉ. इनामदार युनिव्हर्सिटी (Dr. Inamdar University) समोरील बसस्टॉपवर (Bus Stop) ही घटना घडली.
फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ०१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास त्या PMPML बसमध्ये चढत असताना, बसमधील गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हातातील १ लाख ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी काढून चोरून नेली.
याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा (गु.र.नं. २६१/२०२५) दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अशा गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.