Pune City Live News: कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत महंमदवाडी (Mohammed Wadi, Pune) येथे एका महिलेच्या हँड पर्सची जबरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादी महिला, वय ४६, उंड्री (undri pune) येथील रहिवासी, रात्री ९:२० च्या सुमारास दुचाकीवरून कडनगर(Pune News Today) चौकाच्या अलीकडे जात असताना ही घटना घडली.(Pune News today Marathi)
महिलेच्या दुचाकीवर पाय ठेवण्याच्या जागेवर ठेवलेली हँड पर्स दोन अनोळखी मोटारसायकलस्वारांनी लंपास केली. हँड पर्समध्ये रोख ५०,००० रुपये, सोन्याच्या दोन अंगठ्या आणि मोबाईल असा एकूण १,१०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल होता.
चोरट्यांनी मोटारसायकलवरून जवळ येऊन हँड पर्स हिसकावून नेली. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून अद्याप अटक झाली नाही. कोंढवा पोलीस ठाण्यात भादवि कलम ३९२, ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिस तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि अशा प्रकारच्या घटनांबाबत तात्काळ पोलीसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.