
Pune : मांजरी ब्रु मध्ये घरातून २.७ लाखांचे दागिने गायब !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आई व बहिण यांचे वापरते सोन्याचे दागिने स्वयंपाकघरातील एका डब्यात ठेवण्यात आले होते. दिनांक ३० मे २०२४ रोजी फिर्यादी यांचे कुटुंब लग्नाला जात होते. लग्नापूर्वी फिर्यादी यांचे आईने डब्यात ठेवलेले दागिने तपासले असता ते गायब असल्याचे आढळून आले.
फिर्यादी यांच्या आईने तात्काळ हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि पुरावे गोळा केले. तसेच, चोरीच्या घटनेचा तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना आपल्या घरांची दारे-खिडक्या नीट बंद ठेवण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद व्यक्तीबाबत पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.