Pune News: एस बी रोड परिसरात चंदनाची झाडे चोरी: ६०,००० रुपयांचे नुकसान

0
Pune news

Pune news

पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२४ – एस बी रोड(SB Road Pune) परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून (Pune News Today)चंदनाची दोन झाडे कापून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे जवळपास ६०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. अज्ञात चोरट्यांनी या झाडांची चोरी करून पोबारा केला आहे.

चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, हा प्रकार दि. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास सुरू झाला आणि दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:०० पर्यंत चालू होता. चोरट्यांनी प्लॉट नं. १२, नवराजस्थान सोसायटी आणि प्लॉट नं. ०८, निल कमल, विश्रामबाग हौसिंग सोसायटी येथे असलेली चंदनाची दोन झाडे कापून चोरली.

चोरीच्या घटनेत, फिर्यादींच्या नवराजस्थान सोसायटीत असलेले चंदनाचे झाड आणि दुसऱ्या साक्षीदारांच्या विश्रामबाग हौसिंग सोसायटीत असलेले चंदनाचे झाड असा एकूण ६०,००० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३३/२०२४ दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप चोरट्यांचा शोध लागलेला नाही. सहायक पोलीस निरीक्षक मिसे या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *