मुळशी धरण परिसरात मुसळधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढविला !

आपणास याद्वारे कळविण्यात येते की, मुळशी धरण परिसरात मुसळधार पावसामुळे धरणाच्या सांडव्यावरून सोडण्यात आलेला २५०० क्युसेक्स विसर्ग वाढवून सायंकाळी ५ वाजता ५०००-७५०० क्युसेक करण्यात आला आहे.

पर्ज्यन्यवृष्टी व आवक वाढल्यास विसर्गात वाढ करून १०,००० क्युसेक्स करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सावध राहावे आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या सूचनांचे पालन करावे.

खबरदारीच्या सूचना:

  • नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहावे.
  • शक्य असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.
  • प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
  • आपत्कालीन मदतीसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.

संपर्क: आपत्कालीन मदतीसाठी तात्काळ ११२ किंवा स्थानिक प्रशासनाच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Comment