PMPML निगडी आगारातील वाहक-चालकांनी चोरी रोखली, चक्कर येऊन पडलेल्या प्रवासी मुलीला मदत केली

PMPML चा निगडी आगार कर्तव्यात स्मार्ट

पुणे:-पीएमपीएमएलच्या निगडी आगारातील वाहक-चालकांनी कर्तव्यात स्मार्ट असल्याचे दिसून आले आहे. नुकतीच निगडी आगारातील वाहक-चालकांनी एका प्रवाशाची बॅग, स्मार्टफोन, सोनसाखळी चोरी रोखली. तसेच, दांडेकरपुल येथे चक्कर येऊन पडलेल्या प्रवासी मुलीला ताबडतोब दवाखान्यात दाखल केले. यामुळे प्रवासी आणि नागरिकांनी वाहक-चालकांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

कात्रज ते भक्ती शक्ती (बायपास) या मार्गावर प्रवास दरम्यान एका प्रवाशाची बॅग बस मध्ये विसरली असल्याचे सदर बसचे वाहक रामराव आंदे यांच्या लक्ष्यात आले. त्यांनी ती बॅग भक्ती शक्ती स्थानकाचे स्थानकप्रमुख प्रदीप कुदळे याच्याकडे जमा केली. बॅगमधील कागदपत्रांच्या आधारे ती बॅग कुणाल प्रसाद रा.मोरे वस्ती,चिखली यांची असल्याची खात्री झाल्यावर संबंधित प्रवासी यांच्या मोबाईल वर संपर्क साधून त्या प्रवाश्यास सुपुर्द केली. त्यात त्यांचे महत्त्वाचे कागदपत्रे,तसेच Samsung कंपनीचा लॅपटॉप अंदाजे 40 हजार रू होता. यावेळी वाहक राम आंदे यांच्यासह चालक लकी ठाकरे,सुरक्षा विभागाचे एरिक लोबो उपस्थित होते.

यावेळी संबंधित प्रवासी यांनी पीएमपीएमएल संस्थेचे व स्थानक प्रमुख,वाहक-चालक सेवक यांचे आभार मानले. त्यांनी PMPML संस्थेची नाव जनमानसात नावलोकिक केल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर व स्थानक प्रमुख यांचे अभिनंदन होत आहे.

पीएमपीएमएलचे नावलौकिक वाढविण्यासाठी सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी सतत प्रयत्नशील असल्याचे राष्ट्रवादी जनरल कामगार युनियन पिं.चिं.विभागाचे कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले. यापुर्वीही पीएमपीएमएलच्या अध्यक्ष मा.बकोरिया साहेब यांनी निगडी आगारातील वाहक-चालक यांच्या कार्याची दखल घेऊन रोख रक्कम बक्षीसाच्या स्वरूपात देऊन प्रोत्साहन दिले आहे. असा उपक्रम पीएमपीएमएलने यापुढेही सुरू ठेवुन धाडसी,कर्तव्यदक्ष सेवकांना प्रोत्साहन द्यावे असेही त्यांनी सांगितले.

प्रमुख ठळक मुद्दे

  • निगडी आगारातील वाहक-चालकांनी एका प्रवाशाची बॅग, स्मार्टफोन, सोनसाखळी चोरी रोखली.
  • दांडेकरपुल येथे चक्कर येऊन पडलेल्या प्रवासी मुलीला ताबडतोब दवाखान्यात दाखल केले.
  • प्रवासी आणि नागरिकांनी वाहक-चालकांच्या कार्याचे कौतुक केले.
  • पीएमपीएमएलचे नावलौकिक वाढविण्यासाठी वाहक-चालक सतत प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले.
You might also like

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More

Privacy & Cookies Policy