---Advertisement---

Pune: राजस्थानि तरुणाचे पुण्यात कारनामे , चोरले ५५ मोबाईल फोन आणि लॅपटॉपस !

On: June 16, 2024 7:50 AM
---Advertisement---

पुणे: ५५ मोबाईल फोन आणि लॅपटॉपसह चोर अटक! फरासखाना पोलीसांनी यशस्वी कारवाई!

Pune City Live News : फरासखाना पोलीसांनी एका धाडसी कारवाईत ५५ मोबाईल (Pune News Today )फोन आणि एक लॅपटॉपसह एका इसमास अटक केली आहे.(Pune News today Marathi)

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार,

  • दिनांक १० जून २०२४ रोजी, फरासखाना पोलीस स्टेशनमधील अंकित गाडीतळ पोलीस चौकीतील पोलीस अमलदार अकबर कुरणे यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की, रेल्वे भरावजवळ, शाहीर अमर शेख चौकातील सिग्नलजवळ, मंगळवार पेठ, पुणे येथे एक छत्री आणि पेन विकणारा इसम, ज्याच्याकडे भरपूर मोबाईल फोन आहेत.

माहितीची पुष्टी करून,

  • वरिष्ठांना कळवून, सपोनि गायकवाड आणि स्टाफ यांनी शाहीर अमर शेख चौक, रेल्वे भरावजवळ, मंगळवार पेठ येथे धाड टाकली.
  • तेथे, बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे एका इसमास ताब्यात घेण्यात आले आणि त्याचे नाव आणि पत्ता विचारण्यात आले.
  • त्याने आपले नाव संतराम सुग्रीव खलदी, वय ३० वर्षे, रा. खाल्दी, तहसील किसनगंज, जिल्हा वारा, राज्य राजस्थान असल्याचे सांगितले.
  • त्याच्या हातात एक मोबाईल फोन होता. त्या मोबाईल फोनबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

शंका वाढल्याने,

  • त्याच्या बॅगेची तपासणी केली असता त्यातून एक एच.पी. कंपनीचा लॅपटॉप, ४९ Android मोबाईल फोन आणि ०५ साधे keypad असलेले विविध कंपन्यांचे फोन सापडले.
  • जप्त केलेल्या ५५ मोबाईल फोनची एकूण किंमत ६,२०,००० रुपये अंदाजे आहे.

तपासातून कळले की,

  • हे मोबाईल फोन त्याने पुणे शहरातील विविध ठिकाणाहून चोरी केले होते.
  • त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

PCMC मध्ये १२ वी पाससाठी मोठी भरती! महिला आणि मुलींसाठी सुवर्णसंधी – २०१ जागांसाठी अर्ज करा!

Jobs: इंटरनॅशनल सिक्युरिटी कंपन्यांमध्ये सुवर्णसंधी: पोलिसांपेक्षा जास्त पगार

2024 मध्ये 12वी पास महिलांसाठी सरकारी नोकऱ्या

या यशस्वी कारवाईसाठी,

  • पोलीस उपायुक्त परि-१ श्री. संदीपसिंग गिल्ल, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग श्री. मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, सपोफौ. प्रशांत शिंदे, पोलीस अंमलदार गुरव, अकबर कुरणे, बनकर आणि सुर्वे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment