पुणे: दगडूशेठच्या दर्शनाला जाणाऱ्या तरुणावर जुन्या भांडणातून हल्ला; डोक्यावर लोखंडी हत्याराने वार, चार जण ताब्यात

0
jpeg (15)

पुणे: दगडूशेठच्या दर्शनाला जाणाऱ्या तरुणावर जुन्या भांडणातून हल्ला; डोक्यावर लोखंडी हत्याराने वार, चार जण ताब्यात


पुणे: शहरातील बुधवार पेठेत एका तरुणावर जुन्या भांडणाच्या रागातून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जात असताना एका टोळक्याने तरुणाला लोखंडी हत्याराने मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. Pune: Youth on his way to visit Dagdusheth temple attacked over old dispute

ही घटना दि. २६/०८/२०२५ रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेतील डमढेर बोळ येथे घडली. फिर्यादी आपल्या मित्रांसोबत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी जात होते. त्याचवेळी, त्यांच्यासोबत पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना अडवले.

आरोपींनी फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर लोखंडी हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या उजव्या हातावर आणि डोक्यावर गंभीर दुखापत झाली.

या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत सौरभ राजेश साठे (वय २५), साईनाथ संजय जाधव (वय २६), गौरव रविंद्र लांगडे (वय २०) या तिन्ही आरोपींना अटक केली आहे, तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलीस उप-निरीक्षक शितल जाधव अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed