Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

Hinjewadi Spa Raid: ‘हेवन स्पा’मध्ये सुरू होतं काळं कृत्य! IT हबमध्ये देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश; मॅनेजरला बेड्या!

0

आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या हिंजवडी (Hinjewadi) परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उच्चभ्रू वस्तीत असलेल्या एका स्पामध्ये चक्क ‘हेवन’च्या नावाखाली नरक सुरू असल्याचा उलगडा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) टाकलेल्या या धाडीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, एका बड्या मॅनेजरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नेमकं काय घडलं ‘हेवन स्पा’मध्ये? जाणून घ्या सविस्तर बातमी.

Heaven Spa वर मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडीतील ओम हाईट्स बिल्डींगमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या ‘Heaven Spa’ (शॉप नंबर ३०१) मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ६ मार्च २०२६ रोजी रात्री ८:२१ च्या सुमारास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (Anti-Human Trafficking Unit) या ठिकाणी सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहविक्रय करून घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

पाषाणचा मॅनेजर अटकेत; ‘अशा’ पद्धतीने चालायचा धंदा
या प्रकरणी पोलिसांनी वासुदेवन मनि पिल्लेय (वय ४१ वर्षे, रा. पाषाण रोड, पुणे) याला अटक केली आहे. आरोपी वासुदेवन हा या स्पाचा मॅनेजर म्हणून काम पाहत होता. तो स्वतःच्या उपजीविकेसाठी पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून हे बेकायदेशीर कृत्य करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ कलम १४३ (३), ३ (५) आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉस्पिटल आणि लेडीज PG पासून अवघ्या काही मीटरवर हा प्रकार
धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी हा वेश्याव्यवसाय सुरू होता, त्याच्या आजूबाजूला मोठी वर्दळ आणि संवेदनशील ठिकाणे आहेत. ‘Heaven Spa’ च्या पश्चिमेस १५० मीटरवर डॉ. डिंपल कोकल यांचे कौशल्या हॉस्पिटल (Kaushalya Hospital), ११० मीटरवर डॉ. दिव्या प्रकाश यांचे डेंटल क्लिनिक आणि अवघ्या ३० मीटर अंतरावर ‘मॅगनम पी जी’ (Magnum PG) हे महिलांचे वसतिगृह आहे. अशा सार्वजनिक आणि शैक्षणिक वातावरणात हे रॅकेट चालवले जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनिय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक पाटील पुढील तपास करत आहेत. आयटी हबमधील अशा स्पा सेंटर्सवर पोलिसांची सतत नजर असणे गरजेचे आहे का? तुम्हाला काय वाटते, अशा गुन्हेगारांवर कोणती कठोर कारवाई व्हायला हवी? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही बातमी शेअर करा.

Follow Us
Leave A Reply

Your email address will not be published.