Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

आमदार गोपीचंद पडळकरांना ट्रॅफिक नियमांचा विसर? संतोष पंडित यांनी रस्त्यावरच जाब विचारत काढला व्हिडिओ; सोशल मीडियावर जोरदार चर्चा!

0

पुणे (Pune City Line): सर्वसामान्य नागरिकांनी वाहतुकीचे नियम मोडल्यास तत्काळ कारवाई करून दंड आकारणाऱ्या प्रशासनाचे नियम लोकप्रतिनिधींना लागू होत नाहीत का? असा संतप्त सवाल पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनाला एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट नसणे आणि सीटबेल्टचा वापर न करणे यावरून संतोष पंडित यांनी त्यांना थेट रस्त्यावरच जाब विचारला असून, या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

संतोष पंडित यांनी थेट विचारले रोखठोक सवाल

व्हिडिओमध्ये संतोष पंडित यांनी आमदार पडळकर यांच्या वाहनाजवळ जाऊन, “गाडीला नियमानुसार एचएसआरपी नंबर प्लेट का नाही?” अशी विचारणा केली. त्यावर मराठी नंबर प्लेट असल्याचे सांगण्याचा प्रयत्न झाला असता, “नियम सर्वांसाठी सारखेच आहेत; जर मराठी नंबर प्लेट चालत असेल तर सर्वसामान्य जनतेलाही तशी परवानगी द्यावी किंवा तुम्ही आमदार आहात तर तसा अधिकृत नियम जाहीर करा,” असा रोखठोक सवाल संतोष पंडित यांनी उपस्थित केला.

त्याचबरोबर गाडीतील चालकाने आणि नेत्यांनी सीटबेल्ट लावला नसल्याचेही त्यांनी कॅमेऱ्यासमोर निदर्शनास आणून दिले. चित्रीकरण सुरू असताना त्यांना “व्हिडिओ बंद करा” असे सांगण्यात आले; मात्र न डगमगता संतोष पंडित यांनी “सर्वसामान्यांना दंड आणि नेत्यांना मोकळीक का?” असा सवाल उपस्थित करत हा सर्व प्रकार समोर आणला.

Has MLA Gopichand Padalkar forgotten traffic rules? Santosh Pandit confronted him right on the street and recorded a video; the incident has sparked a heated discussion on social media.

Follow Us
Leave A Reply

Your email address will not be published.