Burglary at Uruli Devachi’s house : बंद घराचा फायदा घेत चोरट्यांचा हात साफ; उरुळी देवाची येथे घरफोडीत तब्बल ५ कोटींच्या ऐवजाची चोरी

0
jpeg (16)

पुणे: बंद घराचा फायदा घेत चोरट्यांचा हात साफ; उरुळी देवाची येथे घरफोडीत तब्बल ५ कोटींच्या ऐवजाची चोरी


पुणे: शहरालगतच्या उरुळी देवाची परिसरात एका बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी तब्बल ४ कोटी ९५ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.Burglary at Uruli Devachi’s house

ही घरफोडी दि. २४/०८/२०२५ रोजी सकाळी ११:३० ते दि. २५/०८/२०२५ रोजी रात्री १० वाजेच्या दरम्यान घडली. फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद असताना, अज्ञात चोरट्याने घराच्या बाजूच्या स्लायडिंग खिडकीतून आत प्रवेश केला.

घरात प्रवेश केल्यानंतर, चोरट्यांनी बेडरूममधील कपाटातील १,५०,०००/- रुपये रोख आणि सोन्याचे दागिने चोरी करून नेले. या चोरीत फिर्यादीचे एकूण ४ कोटी ९५ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख अधिक तपास करत आहेत. नागरिकांनी आपले घर बंद ठेवताना अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed