Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

Sanaswadi news today : सणसवाडीतून १६ वर्षीय भोजपुरी मुलीचे अपहरण; शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

0

Sanaswadi news today : शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळ उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रहिवासी असलेले संजय प्रसाद यांचे कुटुंब उपजीविकेसाठी मागील दोन वर्षांपासून सणसवाडी (ग्रामपंचायतीजवळ, सिंधुबाई वाखारे यांच्या खोलीत) वास्तव्यास आहे. दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी घरातील सर्वजण मजुरीच्या कामासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांची १६ वर्षे ७ महिने वयाची मुलगी ….. ही घरी एकटीच होती.

दुपारी ३ वाजता मुलगा घरी आला असता बहीण निशु घरात दिसली नाही. संध्याकाळी संपूर्ण कुटुंबाने आजूबाजूचा परिसर, गाव व नातेवाईकांकडे कसून शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही. अखेर अज्ञात इसमाने तिला फुस लावून पळवून नेल्याची खात्री पटल्याने आई रूणीदेवी प्रसाद यांनी शिक्रापूर पोलिसांत तक्रार दिली.

मुलीचे वर्णन:

  • नाव: ….(वय १६ वर्षे ७ महिने)

  • उंची व रंग: ४.६ फूट, गोरा रंग, काळे लांब केस, मध्यम बांधा

  • पोशाख: विटकरी रंगाचा सलवार-कुर्ता, पायात काळी चप्पल, कानात छोटे टॉप्स, नाकात फुली

  • भाषा: हिंदी, भोजपुरी

शिक्रापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अन्वये गुन्हा र.नं. ७२७/२०२६ नुसार नोंद केला आहे. दाखल अंमलदार पोलीस हवालदार गायकवाड असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख करत आहेत.

Follow Us
Leave A Reply

Your email address will not be published.