Pune News : Stay up-to-date with the latest pune news and local news from Pimpri Chinchwad with Pune City Live . Explore latest updates from Politics news, entertainment to crime news.

Patas news today: पाटस टोलनाक्यावर भरधाव वाहनांची धडक; बूम बॅरिअर तोडून पसार झालेल्या दोन अज्ञात चालकांवर यवत पोलिसांत गुन्हा दाखल!

0

Patas news today: :सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोलनाक्यावर भरधाव वेगात आलेल्या दोन वाहनांनी टोल गेटचे बूम बॅरिअर तोडून नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही अज्ञात वाहनचालकांवर सार्वजनिक संपत्तीचे नुकसान व निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटस टोलनाक्यावर २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९:५५ वाजेच्या सुमारास सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेन क्रमांक ५ मधील बूम बॅरिअर बंद असताना महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. MH 16 OY 4039) वरील अज्ञात चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून बॅरिअर तोडले व पळ काढला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच (सकाळी १०:०० वाजता) लेन क्रमांक ४ मधून जाणाऱ्या हायड्रा क्रेन (क्र. MH 42 O 9270) वरील अज्ञात चालकानेही निष्काळजीपणे बूम बॅरिअर तोडून पुण्याच्या दिशेने पलायन केले.

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी पाटस टोलनाक्याचे लीगल ऑफिसर योगेश बाळासाहेब सरोदे (वय ३७, रा. तांदुळवाडी, बारामती) यांनी यवत पोलीस स्टेशन अंतर्गत पाटस दूरक्षेत्र येथे फिर्याद दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १२५, ३२४(४), मोटार वाहन कायदा कलम १८४ आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम ३ अन्वये गुन्हा (गु.र.नं. ८६६/२०२६) दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक/सफौ आर. व्ही. शिंदे करत आहेत.

Follow Us
Leave A Reply

Your email address will not be published.