Pune : शेजारचे बाहेर गेले होते याची नजर त्यांच्या कुत्रीवर पडली ; हडपसरमध्ये श्वानावर अत्याचार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कुत्र्याचा मालक परगावी गेला असताना घडली. परत आल्यानंतर त्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर त्याने तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपीचे नाव हलीमुद्दीन शेख (वय २० वर्षे, सध्या राहणार: सुंदर सोसायटी, हांडेवाडी, हडपसर, पुणे; मूळ गाव: कांदोरी, थाना खडगाव, जिल्हा मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल) आहे. तो सध्या हडपसरमधील हांडेवाडी परिसरात राहतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अशा अमानुष कृत्यांमुळे समाजात प्राण्यांबद्दल असंवेदनशीलता वाढत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे.