Pune शहराच्या नारायण पेठ (narayan peth) परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साईबाबांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या एका ६० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातून तब्बल ९१,८००/- रुपये किमतीची सोन्याची चेन चोरीला गेली आहे. ही घटना २९ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास फडके हौद चौक ते देवजीबाबा चौक दरम्यान घडली.
फरासखाना (faraskhana police station) पोलीस ठाण्यात याप्रकरणी भा.न्या.सं.क. कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा (गु.र.नं. १२४/२०२५) दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्या साईबाबांच्या पालखीच्या मागे गर्दीत चालत असताना, गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मागून येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली.
सध्या या प्रकरणात कोणताही संशयित आरोपी अटक करण्यात आलेला नाही. फरासखाना पोलीस या अज्ञात चोरट्याचा शोध घेत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पालखी सोहळ्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पुणे शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडींसाठी ‘पुणे सिटी लाईव्ह’ला सोशल मीडियावर सर्व ठिकाणी फॉलो करा.