---Advertisement---

वालवडमध्ये iTech Online Services चा शुभारंभ – ग्रामीण भागात आता ई-गव्हर्नन्स सेवा अधिक सुलभ!

On: April 30, 2025 4:08 PM
---Advertisement---

वालवड (ता. कर्जत, जि. अहमदनगर) – ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. iTech Online Services या नव्या CSC (Common Service Center) च्या उद्घाटनाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.

या केंद्राच्या माध्यमातून गावातच आता ई-गव्हर्नन्स सेवा (iTech Marathi E-Governance Services) सहजपणे उपलब्ध होणार आहेत.

कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी iTech E-Governance Services चे संस्थापक महेश राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करत सांगितले की,
“हा उपक्रम ग्रामीण भागातील युवकांना डिजिटल सेवेचा लाभ मिळावा, यासाठी सुरू केला आहे. लोकांना आधार, पॅन, पीएम किसान, बँकिंग सेवा, तसेच सरकारी योजनांची माहिती व नोंदणी यासाठी आता शहरात जाण्याची गरज उरणार नाही.”

या सेवांमध्ये खालील प्रमुख सेवा उपलब्ध असणार आहेत:

  • आधार व PAN कार्ड सेवा
  • पीएम किसान, उदयामित्र, श्रमयोगी योजना
  • बँकिंग आणि DBT सेवा
  • ऑनलाईन फॉर्म भरणे व प्रिंटिंग
  • रोजगार व शैक्षणिक मार्गदर्शन

iTech Online Services हे केंद्र Pune City Live Media Network च्या सहकार्याने कार्यरत होणार आहे.

ग्रामीण भागातील डिजिटल परिवर्तनासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.

Editorial Team

Pune City Live या वेबसाईटचे आपल्या वेबसाईटसाठी विविध क्षेत्रांतील बातम्या आणि लेख लिहितात. त्यांच्या लेखणीतून पुण्यातील विविध घडामोडी, घडामोडींची विश्लेषणे, तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवरील माहिती वाचकांपर्यंत पोहोचवली जाते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment