सोशल मीडियावर या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे. पुण्यातील अनेक नागरिकांनी X वर पोस्ट करत आपला संताप आणि शोक व्यक्त केला आहे. “गड्या आपला गाव बरा, चुलीत गेले ते काश्मीर पर्यटन. दोन निष्पाप जीव गेले. दोन्ही भावांना भावपूर्ण श्रद्धांजली!! ओम शांती,” अशी प्रतिक्रिया
या युजरने दिली. तर अनेकांनी “ॐ शांती” आणि “भावपूर्ण श्रद्धांजली” अशा पोस्ट्सद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.