पुणे, दि. २१ ऑक्टोबर २०२४ – बिबवेवाडी (Bibvewadi News )परिसरात एका(Pune News today) तरुणावर रिक्षामध्ये प्रवास करत असताना दोन इसमांनी हल्ला करून त्याच्याकडून मोबाईल हिसकावण्याचा आणि रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, हा प्रकार २१ ऑक्टोबर रोजी रात्री १:३० च्या सुमारास घडला. फिर्यादी प्यासा हॉटेल ते सेव्हन लव्ह चौक या मार्गावर रिक्षातून प्रवास करत असताना, रिक्षामधील दोन इसमांनी त्याला अचानक मारहाण केली आणि त्याच्या कडील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, रोख ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले.
NABARD मध्ये १ ० वि पास वर Office Attendant ची भरती ! ५ ० ० ० ० पगार लगेच करा अर्ज !
पोलिसांनी या प्रकरणात शहामुद्दीन मुल्ला ( रा. बिबवेवाडी, पुणे) या इसमाला अटक केली आहे. त्याच्यासोबत आणखी दोन साथीदार गुन्ह्यात सहभागी होते, ज्यांची चौकशी सुरू आहे.
NABARD मध्ये १ ० वि पास वर Office Attendant ची भरती ! ५ ० ० ० ० पगार लगेच करा अर्ज !
खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, गुन्हा क्रमांक ३७५/२०२४ अंतर्गत कलम ३०९ (६), १२५ (अ) आणि ३(५) नुसार या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलीस अधिक तपास करीत असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.